

From the Publisher Think and Grow Rich थिंक अॅण्ड ग्रो रिच' हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे 'पैसे कमावण्याचे गुपित' आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते. ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे. स्वतःची ध्येये ओळखा. खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा. जीवनात जे हवे ते मिळवा. परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा. या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता? मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा. ‘‘नेपोलियन हिल यांची यशस्वी सिद्ध झालेली समृद्धीकडे नेणारी पावले आजच्या वाचकांसाठीही तेवढीच विश्वसनीय आहेत, जेवढी ती त्यांच्या समकालीन लोकांसाठी होती. हे तत्त्वज्ञान जे वाचतील, त्याला समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करतील ते सगळे जीवनाच्या उच्च मापदंडांना आकर्षित करतील व त्यांचा उपभोग घेण्यासाठी तयार होतील. या मापदंडासाठी जे तयार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांसाठी ती लागू पडत नाही. जेव्हा तुम्ही नेपोलियन हिलच्या संकल्पनांचा सक्रियपणे अवलंब करू लागाल तेव्हा तुमच्या जीवनविषयक दृष्टिकोनात मोठे बदल घडवून आणण्यासाठी तयार राहा. सुसंवादाने आणि समजदारीने जीवनाचा उपभोग घेण्यासाठी; तसेच श्रीमंत लोकांच्या रांगेत तुम्हाला नेऊन बसवण्यासाठी ते पूर्वपीठिका तयार करण्यास तुम्हाला मदत करील. ’’ - डॉ. आर्थर आर. पेल. जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरावरील हजारो लोकांनी ज्याचा व्यवहारात पडताळा घेतला आहे असे रहस्य या पुस्तकात समाविष्ट आहे. 500 हून अधिक धनसम्राटांनी इतकी अफाट संपत्ती कशी मिळवली, याचे गुपित या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात नमूद केलेले आहे. या गुपिताची 20 वर्षे पडताळणी व्हायच्या आधीही ते एक लाखाहून जास्त स्त्री-पुरुषांच्या हाती सोपवले गेले. त्यांनी त्याचा वापर व्यक्तिगत फायद्यासाठी केला. काहींनी त्याच्या मदतीने धन कमावले. तर इतरांनी या गुपितचा वापर त्यांच्या घरात सुसंवाद निर्माण करण्यासाठी केला. ज्याला मी गुपित रहस्य म्हणत आहे त्याचा उल्लेख या पुस्तकात शेकडोवेळा केला गेला आहे. त्याला सरळसरळ नाव दिले गेले नाही. जर ते रहस्य वापरण्याची तुमची तयारी असेल तर हे तुम्हाला प्रत्येक प्रकरणात कमीत कमी एकदा तरी दिसून येईल. या रहस्याबाबत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे की, ज्यांनी ते प्राप्त केले आणि वापरले त्यामुळे ते अक्षरश: यशाकडे वाहून नेले गेले. जे या रहस्यासाठी तयार आहेत त्या सर्वांना हे सारखेच उपयोगी पडते. पैसा, प्रसिद्धी, मान्यता आणि सुख, त्या सगळ्यांच्या ओटीत पडू शकते जे या आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी सज्ज झालेले आहेत. हे पुस्तक वाचताना हेपण लक्षात ठेवा की, हे तथ्यांशी, वस्तुस्थितीशी निगडित आहे. कपोलकल्पित गोष्टींशी नाही. ज्यांची तयारी आहे, त्यांना एक सार्वत्रिक सत्य पटवणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. त्या सत्याद्वारे काय करावे एवढेच नाही तर ते कसे करावे आणि याची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेले उद्दिष्ट कसे मिळवावे हे शिकता येईल. सगळ्या सिद्धींचा, कमावलेल्या सगळ्या समृद्धीचा आरंभ फक्त कल्पनेतून होतो जर तुम्ही ते रहस्य ग्रहण करण्यासाठी तयार आहात तर तुम्ही ते आधीच अर्धे हस्तगत केले आहे. त्यामुळे उरलेले अर्धे तुमच्या मनापर्यंत पोहोचता क्षणी तुम्हाला सहजतेने त्याला ओळखता येईल. - नेपोलियन हिल napoleon hill An American journalist, lecturer, and author, Napoleon Hill is one of the earliest producers of 'personal-success literature. As an author of self-help books, Hill has always abided by and promoted the principle of intense and burning passion being the sole key to achieve success. Hill has authored numerous books among which Think and Grow Rich has been his most well-known works and had sold over 20 million copies back in the 1930s. Review: Must buy for young people - Good quality of Page and printing Review: श्रीमंत होण्याचा मार्ग - प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.








| Best Sellers Rank | #6,536 in Books ( See Top 100 in Books ) #13 in Commerce #13 in Money & Monetary Policy #21 in Development & Growth |
| Customer Reviews | 4.5 out of 5 stars 1,455 Reviews |
B**U
Must buy for young people
Good quality of Page and printing
S**Y
श्रीमंत होण्याचा मार्ग
प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.
A**R
Good
Good
V**P
Psychology
Best book to learn how can think like a rich people etc. The best part of book is example and explanation
G**N
Good
Good book
K**V
Is good
Product received in good condition
T**T
It's a good book to build your confidence
Good book for all who thinks to grow in life
D**E
o
Very Nice Book.... Must Read
ترست بايلوت
منذ شهر
منذ 4 أيام