Ravan Raja Rakshsancha [paperback] Sharad Tandale [Jan 01, 2018] …
S**S
Good
Good
G**B
रावण
खरच दशाग्रिव आवडला आणि रावण पण....
B**I
Good book
Nice ..
S**L
The Ravan we don't know
I highly recommend this book to anyone interested in understanding the other side of the Ramayana: the Rakshasa perspective. The book sheds light on the history of the Asuras, Daityas, and Danavas, and tells the story of Ravana in detail, from his birth to his death. We come to understand Ravana as he truly was. While his bad deeds are well-known, his good deeds are often overlooked. This book will make you realize that in any story, no one is a complete hero or villain. "Stories are not always black and white," contrary to what we are taught since childhood.
M**L
ही कादंबरी जगाला माहित असलेला रावण रामायणात दिलेल्या फक्त १०-१५ टक्केच आहे
पुस्तक : रावण : राजा राक्षसांचालेखक : शरद तांदळेअभिवाचन : उपेंद्र लिमये (storytel)५ ऑक्टोबर २०२२आज दसरा....त्यामुळं "रावण " नावाची आठवण येणं साहजिक आहे. पण रावण चांगला की वाईट या वादात न फसता मागच्या आठवड्यात वाचून संपवलेलं ✍🏻 Sharad Tandale लिखित रावण पुस्तक कस वाटलं हे सांगते आजच्या मुहूर्तावर.हजारो वर्षांपासून आपला समाज रावणाला जाळत आला आहे, तरी तो संपलाय कुठे??? प्रत्येक वेळी आपण एकच लॉजिक सांगून जसं अधर्मावर धर्माचा विजय , किंवा पापावर पुण्याचा विजय, किंवा असुरांवर देवांचा विजय असच लॉजिक लावत आलोय. पण लेखकाच्या लेखणीने रावण एक सामान्य व्यक्ती ते राक्षसांचा राजा पर्यंतचा प्रवास खोल रित्या मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.खरचं रावण म्हंटल की पहिला डोळ्यासमोर येतो तो दहा तोंडाचा , क्रूर, अधर्मी, सितेच अपहरण करणारा, वाईट असा तो ..कारण हेच तर लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल गेलं आहे. पण खरचं रावण तेवढा क्रूर होता का ? त्याला खरचं दहा तोंड होती का ? त्याचे आईवडील कोण? तो असूर होता की ब्राम्हण? त्याची पूर्ण वंशावळ ? लंका सोन्याची बनवायची idea कुणाची ? बनवली कुणी ? पुष्पक विमान कुणाचं ?? रावणान सीतेला पळवून नेण्याचं खर कारण काय ? रावण हे नाव कुणी दिलं ? त्याचा अर्थ काय ?अशा अनेक प्रश्नांची यादी माझ्या कडे होती,ज्यांची बऱ्यापैकी विज्ञाननिष्ठ उत्तर मला या कादंबरी मधून मिळाली.एवढंच नव्हे तर दानव, दैत्य, असूर हे सगळे फक्त समानार्थी शब्द नसून वेगवेगळ्या जाती जमाती आहेत हे समजलं ज्यांना एकत्र करून राक्षस संस्कृतीचा पाया रावणाने रचला. ही कादंबरी वाचून मनांत भाव-भावनांचा कल्लोळ होतो. लेखकाच लिखाण अगदी भुरळ घालणार आहे. इतकं की रावणाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू खूप बारकाईने अभ्यास करून लिहिले गेले आहेत. कुठेही अतिशयोक्ती नाही, त्यामुळे रावण as a Hero or Villan असं कुठेही वाटतं नाही, उलट त्याच्या बद्दल राग, कीव, दया, परिस्थितीमुळे झालेला अघोरी असे समिश्र भाव तयार होतात. विशेष म्हणजे रावण फक्त शिवभक्त नसून शास्त्र, आयुर्वेद, वेद, राज्यशास्त्र, न्यायशास्त्र, संगीत शास्त्र सारख्या कलामध्ये पारंगत असून बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावण संहिता, कुमार तंत्र अशा अनेक ज्ञानाच भांडार होता. रावण रचित शिवतांडव स्तोत्र चे तर बरेच जण FAN आहेतच.मला व्यक्तिशः आवडलेले दोन प्रसंग म्हणजे जेव्हां👉🏻 मंदोदरी रावणाला " शुर्पणखेच्या नाकामुळे शरीराचा झालेला विनयभंग आणि सीतेच्या चारित्र्याचा केलेला विनयभंग दोन्ही सारखच, राजकीय डावपेचात कुणीही जिंकत असेल, पण पराजय कायम स्त्री चांच होत असतो. " अशी स्त्री मनाची जाणिव करून देते तेव्हा... 👉🏻 आणि दुसरा जेव्हां रावण लक्ष्मणाचा शिष्य म्हणून स्वीकार करून त्याला शेवटचा उपदेश करतो. self analysis महत्त्वाचे त्यामधून त्यांनी सांगितलेले पुढील २ मुद्दे आवडले 👉🏻स्वतःशी होणारा संवाद हा मनाची दृढता वाढवतो आणि लेखनानं ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अजून एक म्हणजे लहानपणी जेव्हां दशग्रिवाने ( रावणाने ) हट्टापायी पकडलेल सुंदर फुलपाखरू आईच्या समजावण्या नंतर सोडून दिल्यावर हाताला लागणारा रंग आणि सितेच अपहरण करून, सोडून देणार असला तरी तिच्या चारित्र्यावर पडलेला विनयभंगाचा डाग या दोन्ही मधील comparison आवडल.या पुस्तकाचा सर्वात चांगला भाग म्हणजे जादू आणि मंत्रमुग्ध वगैरे अशा कोणत्याही भाकड कथा नाहीत. (एक पुष्पक विमान सोडता: तेवढा पाहिजेच ) देव आणि राक्षसांच्या अतिशयोक्तीपूर्ण असाधारण शक्तींचा उल्लेख न करता पूर्णपणे तार्किक वर्णन केलं आहे. रावण, त्याच ज्ञान त्यांनी केलेल्या चुका यातून आपण काय शिकलो याचा पुनर्विचार करायला भाग पडतं.ही कादंबरी जगाला माहित असलेला रावण रामायणात दिलेल्या फक्त १०-१५ टक्केच आहे याचा पुरावा आहे. आणि यातच लेखकाच्या कल्पना शक्ती आणि लेखणी चा अभिमान आहे...अर्थात अस मला वाटत....-✍🏻मधुरा राजेंद्र पाटील
S**I
It's very nice book
I love it
A**I
It can change your perspective
The quality of book is good. The writer has the quality to make you think about Raavana from a different perspective. It also teaches us about different hurdles in life and how to get pass it(if you think of it as it).
P**E
Good one....
ترست بايلوت
منذ 4 أيام
منذ 5 أيام